Ad will apear here
Next
राशी आणि सल्ले


सल्ला नेहमी तुळेच्या मंडळींकडून घ्यावा. तो बऱ्यापैकी समतोल असतो. मेष आणि वृश्चिकेची मंडळीही सल्ला देतात; पण तो अत्यंत एकांगी आणि बराचसा आक्रमक पर्यायाचा असतो. मीन राशीची मंडळी सल्ला देताना सरतेशेवटी तुम्हालाच दोन पर्याय देऊन कन्फ्यूज्ड ठेवतात आणि सल्ला देतच नाहीत. सिंह राशीची माणसंही उत्तम सल्लागार असतात; पण त्या सल्ल्याचा पुढे त्यांच्या स्वतःच्या आयुष्याशी कधी संबंध येणार नाही हे अगोदर कन्फर्म करतात. मकर आणि वृषभेची मंडळी सल्ला दिल्यानंतर तुम्हाला गरज वाटली तर त्यांच्या हातातील महत्त्वाची कामं बाजूला ठेवून तुमच्याबरोबर यायलाही तयार होतात.

उदा. तहसीलदारांना भेटू की नको?

तूळ : मला वाटतं भेट तू. जाताना एक लेखी अर्ज आणि त्याची फोटो कॉपी घेऊन जा. Received with sign कर. अमुक तमुक मुद्दे कव्हर कर आणि परत ये.

मेष/वृश्चिक : नक्की जा, कसं काम करत नाही तेच बघ. त्यांना म्हणावं माझा भाऊ xxxxमधे पत्रकार आहे. मोबाइलचं रेकॉर्डिंग सुरू ठेव.... बघू आपण.

मीन : खरं म्हणजे तू जाऊच नको. त्यांना भेटून काही होईल असं मला वाटत नाही. किंवा एक काम कर एकदा भेटून बघच... एकदा भेटायला काय हरकत नाही.

सिंह : भेटायला हवंच. काही हरकत नाही; पण बोलता बोलता चव्हाण साहेबांना माझा रेफरन्स देऊ नको. होणारं काम बिघडेल तुझं... चव्हाणांच्या मते मी अभिमन्यू जगतापांचा माणूस आहे. उगाच तुझं काम बिघडायला नको. माझ्याविषयी विचारलं तर ओळखत नाही असं बिनधास्त सांग...

मकर/वृषभ : तहसीलदारांना भेटायला हवंच. एक काम करू. जेव्हा जाणार आहे तेव्हा मला सांग. माझीच स्विफ्ट काढून जाऊ आपण. उद्या जायचं का बोल? ॲक्चुअली उद्या माझी एक मीटिंग आहे कोकणभवनला पण... सोड. तुझं काम उरकून मग आपण दोघे जाऊ. आणि येताना पामबीच रोडवरून येऊ. तिथे एक भारी सीफूड रेस्टॉरंट आहे.

विनोदबुद्धी
मिथुन राशीची माणसं अतिशय उत्तम विनोदबुद्धी असणारी असतात यात शंकाच नाही; पण यांचे विनोद हे प्रासंगिक आणि इन्स्टंट असतात. यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे नेमका कुठे आणि कोणत्या प्रसंगी विनोद करावा, ते यांना समजत नाही आणि एकदा हसायला सुरुवात केली की यांना आवरता आवरत नाही. 

कुंभेची मंडळी शनिप्रधान आणि धीरगंभीर वाटली तरी यांचे विनोद अत्यंत उच्च दर्जाचे आणि शब्दनिष्ठ असतात. ते दीर्घ काळ स्मरणात राहतात. विनोद करूनही स्वतःचा चेहरा गंभीर ठेवणं आणि अनेकदा स्वतःवरच विनोद करणं यांना बखुबी जमतं.

- सचिन मधुकर परांजपे (पालघर)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FWTGCR
Similar Posts
धनू, मकर, कुंभ राशीला साडेसाती; काही उपाय, उपासना (उत्तरार्ध) शुक्रवार, दिनांक २४ जानेवारी २०२० रोजी सकाळी नऊ वाजून ५३ मिनिटांनी शनिमहाराज मकरेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे त्या वेळेपासून वृश्चिकेची साडेसाती संपून कुंभेची साडेसाती सुरू होते आहे. अशा रीतीने आता धनू, मकर आणि कुंभ या तीन राशींना साडेसाती सुरू असणार आहे. त्या निमित्ताने, पालघरचे ज्योतिष मार्गदर्शक सचिन
धनू, मकर, कुंभ राशीला साडेसाती; काही उपाय, उपासना (पूर्वार्ध) शुक्रवार, दिनांक २४ जानेवारी २०२० रोजी सकाळी नऊ वाजून ५३ मिनिटांनी शनिमहाराज मकरेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे त्या वेळेपासून वृश्चिकेची साडेसाती संपून कुंभेची साडेसाती सुरू होते आहे. अशा रीतीने आता धनू, मकर आणि कुंभ या तीन राशींना साडेसाती सुरू असणार आहे. त्या निमित्ताने, पालघरचे ज्योतिष मार्गदर्शक सचिन
राशी आणि स्वभावांच्या गमतीजमती सिंह रास ही राजयोगी रास म्हणतात. सिंहेची मंडळी थोडी आक्रमक, हुकूमशाही वृत्तीची वगैरे खरं असलं, तरी त्यांचा मूळ स्वभाव हा अत्यंत शांतताप्रिय, सलोखा ठेवणारा आणि शिस्तप्रिय असतो. सिंह मंडळी कधीच भांडकुदळ आणि कुचाळक्या करणारी नसतात.
अडीचकी म्हणजे काय रे भाऊ? साडेसाती ही संकल्पना आता आपल्यापैकी अनेकांना परिचयाची आहेच; पण ‘अडीचकी’ म्हणजे एक्झॅक्टली काय, हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. शनिमहाराज प्रत्येक राशीत साधारणपणे त्यांच्या मंद गतीनुसार अडीच वर्षे भ्रमण करून मग पुढील राशीत प्रवेश करत असतात. त्यांचे हे राशीभ्रमण जेव्हा तुमच्या अगोदरच्या+तुमच्या+तुमच्या नंतरच्या अशा तीन राशीत मिळून (२

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language